ज्ञानसिंधू प्रबोधिनीच्यावतीने मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर

Edited by: ब्युरो
Published on: April 01, 2024 08:27 AM
views 327  views

सावंतवाडी : पोलीस भरतीची तयारी करताय ? तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी. सिंधुदुर्ग जिह्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसिंधू प्रबोधिनीच्यावतीने एक आठवडा मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची सुरुवात दि.13 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8.00 वा. होईल.

या शिबिरासाठी नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. नावनोंदणीसाठी 9309139284, 9422641309 या नंबरवर संपर्क साधायचाय. सहभागी विद्यार्थ्यांना ज्ञानसिंधू प्रबोधिनिकडून एक पुस्तक मोफत मिळेल, तसेच मैदानी चाचणी सोबतच लेखी अभ्यासक्रमाचा पूर्ण आढावा घेतला जाईल. 

    यासाठी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून पोलीस भरती मार्गदर्शना सोबतच सवलतीच्या दरात पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.