कथाकथन स्पर्धेत दिया साटम, श्रुती गावडे, नुपूर लळीतचं सुयश

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 19, 2024 06:26 AM
views 104  views

देवगड : देवगड येथील श्री. स.ह केळकर महाविद्यालय येथे तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत मराठी भाषा विभागा कडून करण्यात आले होते. ही कथाकथन स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री सागर कर्णिक सर, शेठ म. ग. हायस्कूल,  देवगड व प्राध्यापिका पूजा नारिंग्रेकर, श्रीमती. न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड, हे उपस्थित होते. या स्पर्धेचे नियोजन मराठी विभाग प्रमुख यांनी केले. 

या स्पर्धेचा निकाल अनुक्रमे

पाचवी ते आठवी गट

प्रथम पारितोषिक : कु. दिया संदीप साटम. – उमा मिलिंद पवार हायस्कूल देवगड.

द्वितीय पारितोषिक – कु. राज्ञी विवेक कुळकर्णी, शेठ म.ग. हायस्कूल देवगड.

तृतीय पारितोषिक – कु. स्वालिहा रफिक नायकवडे. अ. कृ. केळकर हायस्कूल वाडा.

नववी ते बारावी गट

प्रथम पारितोषिक –  कु. श्रुती विलास गावडे, श्रीमती न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड.


द्वितीय पारितोषिक – कु. अंजली प्रविंद कावले, शेठ म.ग. हायस्कूल देवगड.


तृतीय पारितोषिक – कु. तन्वी विजय गोठणकर, आय.इ.एस. माध्यमिक विद्यालय विजयदुर्ग.


पदवी व पदव्युत्तर गट


प्रथम पारितोषिक – कु. नुपूर मकरंद लळीत, श्री. स.ह. केळकर वरिष्ठ महाविद्यालय देवगड.


द्वितीय पारितोषिक – कु. वैभवी सतीश परब, श्री. स.ह. केळकर वरिष्ठ महाविद्यालय देवगड.


तृतीय पारितोषिक – कु. श्रीश दीपक वाळके, श्री. स.ह. केळकर वरिष्ठ महाविद्यालय देवगड.


सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले.