ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दिया धुरीचे घवघवीत यश !

Edited by: दिपेश परब
Published on: April 02, 2024 06:59 AM
views 79  views

वेंगुर्ला : ब्रेन डेव्हलपमेंट (बीडीएस) परीक्षेत मदर तेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ले येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी दिया धुरी ही विद्यार्थिनीने इंग्रजी माध्यम मधून तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दियाने १०० पैकी ८७ गुण मिळवुन तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला असून तिने ब्रँझ मेडल प्राप्त केले आहे. दियाला तिचे शिक्षक व पालक अदिती धुरी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो तसेच शिक्षक, पालक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.