
देवगड : दिविजा वृद्धाश्रम येथे वयोवृद्ध ज्येष्ठ आजी-आजोबांसाठी गुढीपाडव्यानिमित्त "स्वरगुंजन" या विशेष सांगीतिक मैफिलीचे आयोजन दीक्षित फाऊंडेशन तर्फे करण्यात आले. हिंदू नववर्षाचे स्वागत दिविजा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत करावे आणि त्यांना त्याचा आनंद घेता याना म्हणून या खास मैफिलीचे आयोजन दीक्षित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी केले होते.
स्वरयात्री प्रस्तुत "स्वरगुंजन" मैफिलीमध्ये प्रियांका वेलणकर व संदीप फडके यांनी अभंग, भक्तीगीते, भावगीते, नाट्यगीते अशी बहारदार गाणी सादर केली. हार्मोनियम साथ संदीप फडके, सिंथेसायझर साथ हर्षद जोशी, तबला साथ गौरव पाटणकर, तालवाद्य साथ हार्दिक बाणे यांनी केली. सूत्रसंचालन मानसी करंदीकर हिने केले. ध्वनीव्यवस्था हर्षद जोशी यांनी केली होती. या आयोजनाबद्दल आश्रमाचे व्यवस्थापक संदेश शेट्ये यांनी समाधान व्यक्त केले. आश्रमाचे सर्व कर्मचारी, आश्रमातील आजी आजोबा, उपास्थित ग्रामस्थांकडून दीक्षित फाडेडेशनच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.