कणकवलीत भरला दिवाळी बाजार | बांबू व मातीचे कंदील ग्राहकांचे आकर्षण

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 20, 2022 17:33 PM
views 229  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत च्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी कणकवलीत भरवण्यात आलेल्या दिवाळी बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. मातीच्या वस्तू, बांबू पासून बनवलेले आकाश कंदील, मातीपासून बनवलेले आकर्षक आकाश कंदील यासह बचत गटांच्या माध्यमातून बनवलेल्या फराळाच्या वस्तू व अन्य अनेक वस्तूंचा या दिवाळी बाजारात समावेश आहे. सलग दुसऱ्या वर्षी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून हा दिवाळी बाजार भरविण्यात आला आहे. या दिवाळी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, नगरसेवक विराज भोसले, अभिजित मुसळे,

 आदी उपस्थित होते.