आंदुर्ले ग्रामपंचायत इथं दिव्यांग मेळावा

उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by:
Published on: May 29, 2025 11:45 AM
views 136  views

कुडाळ : ग्रामपंचायत आंदुर्ले, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने  २७ मे रोजी आंदुर्ले ग्रामपंचायत इथं दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न  झाला.

यावेळी आंदुर्ले गावचे सरपंच अक्षय तेंडोलकर, आंदुर्ले माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आरती पाटील, उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य अनिल भगत व प्रसाद सर्वेकर व संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत मेळाव्याचा उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी आंदुर्ले गावाबरोबरच केळूस, तेंडोली, पाट, हुमरमाळा या गावातील दिव्यांग उपस्थित होते. तसेच या मेळाव्यामध्ये सभासद नोंदणी, ऑनलाईन प्रमाणपत्र, रेल्वेपास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन, घरघंटी घरकुल आदी योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी गरजू साहित्याची पण नोंदणी केली गेली तसेच भेटवस्तू देण्यात आली. तसेच कमी दृष्टि, पॅरालीसीस, अपघात यामुळे आलेल्या दिव्यांगाची नोंद यावेळी करण्यात आली.  त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी लाभार्थी यांची कागदपत्रे घेण्यात आली.