
कणकवली : कणकवलीत काल मंत्री उदय सामंत यांची सभा झाली. त्यामध्ये कणकवलीची गत काय केली ? सत्ताधाऱ्यांनी असा टोला त्यांनी लगावला. आमदार निलेश राणे यांनी कणकवलीतील भ्रष्टाचार आम्ही मोडीत काढून असे वक्तव्य केले.
त्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांची बैठक सायंकाळी कणकवली येथे होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर हे कणकवली दाखल झाले. त्यांनी स्थिर सर्वेक्षण पथकाला देखील भेट दिली. योग्य माहिती घ्या, संशयास्पद काही आढळल्यास असून चौकशी करा. तसेच वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी देखील घ्या अशा देखील सूचना त्यांनी उपस्थित स्थिर सर्वेक्षण पथकाला दिल्या.










