वेंगुर्ल्यात रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र, गोवा - कर्नाटकातील रोटरी सदस्यांचा सहभाग
Edited by: दिपेश परब
Published on: December 06, 2023 13:44 PM
views 157  views

वेंगुर्ला : कोकण झोनमध्ये प्रथमच झालेल्या, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० डिट्रिक्ट स्पोर्ट्स २०२३-२४ चे आयोजन करण्याचा सन्मान रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनला मिळाला व या संधीचे सोने करत, अत्यंत नियोजनबद्ध व भव्य असे आयोजन वेंगुर्ला मिडटाऊनने करुन एक गौरवास्पद उंची या डिस्ट्रिक्ट स्पोर्टसला प्राप्त करून दिल्याचे गौरवोद्गार  डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिरभाई बोरसादवाला यांनी काढले. 

    सावंतवाडी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दिपक भाई केसरकर यांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या डिस्ट्रिक्ट स्पोर्टसला शुभेच्छा देत, फार मोठी डिस्ट्रिक्ट इव्हेंट आयोजित करणा-या रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे कौतुक केले. आपण स्वतः रोटरियन असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो व रोटरीच्या कार्यक्रमाला आपले पुर्ण सहकार्य असल़्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 

        रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिट्रिक्ट स्पोर्ट्स इव्हेंट यावर्षी  रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या अयोजनाखाली वेंगुर्ला कॅम्प येथे संपन्न झाले. या स्पर्धांचे उद्घाटन शनिवार २ डिसेंबर रोजी प्रांतपाल रो नासिरभाई बोरसदवाला यांच्या हस्ते व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री रो दिपकभाई केसरकर यांच्या ऑनलाइन पद्धतीने उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भावी प्रांतपाल शरद पै व डॉ.लेनी डिकाॅस्टा , डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अजय मेनन व वासुकी सानजी, डिस्ट्रिक्ट स्पोर्टस सेक्रेटरी संजय साळोखे व सुनील मिरजकर,  इव्हेंट सेक्रेटरी प्रसन्ना देशिंगकर, राहुल कुलकर्णी, गौरव शहा , ऋषिकेश खोत, दादासाहेब कडोलकर, मानसिंग पानसकर, दुर्गेश हरिताय, डॉ सतिश इरकल , रमेश तिवारी, असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे व संजय पुनाळेकर, दिपक बेलवलकर, नितीन बांदेकर, संतोष कांबळे, क्लब प्रेसिडेंट सुहास सातोसकर, संजय रावराणे, प्रविण पोकळे, उमेश नाईक आदी मान्यवरांसहित वेंगुर्ला रोटरी क्लब अध्यक्ष शंकर उर्फ राजू वजराटकर, स्पोर्ट हेड दिलीप गिरप, सचिव योगेश नाईक, खजिनदार पंकज शिरसाट, इव्हेंट अध्यक्ष राजेश घाटवळ, प्रथमेश नाईक, मुकुल सातार्डेकर आदी उपस्थीत होते.

      रोटरी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे : क्रिकेट स्पर्धा विजेता- रोटरी क्लब रामतीर्थ, उपविजेता- रोटरी क्लब कोल्हापूर हॉरिझॉन, १०० मी धावणे पुरुष प्रथम धीरज पाटील (कोल्हापूर), द्वितीय मृणाल परब (वेंगुर्ला), तृतीय डॉ जयसिंग रावराणे (कुडाळ),  १०० मी धावणे महिला प्रथम शेरॉन डिमेलो (दोनापाऊला), राजेश्वरी वासुकी (हुबळी सेंट्रल), डॉ इलाईन रोड्रिक्स (दोनापाऊला), १००×४ रिले प्रथम अभिनंदन वनमुद्रे, रामचंद्र पाटील, विकास जाधव, निलेश भादुळे (कोल्हापूर हॉरिझॉन), द्वितीय स्वप्नील साळवी, राकेश घाणेकर, राजेश घाग, सुरेंद्र येरम (रत्नागिरी), तृतीय योगेश नाईक, राजेश्वर उबाळे, अनमोल गिरप, मृणाल परब  (वेंगुर्ला).

      गोळाफेक पुरुष प्रथम मंदार आचरेकर (रत्नागिरी), द्वितीय निखिल क्षेत्रपाल (कुमठा), तृतीय विकास जाधव (कोल्हापूर), गोळाफेक महिला प्रथम राजेश्वरी वासुकी (हुबळी), द्वितीय वानी इरकाल (धारवाड),  तृतीय डॉ इलाईन रॉड्रिक्स (डोनापाऊला), बॅडमिंटन सिंगल पुरुष प्रथम अनमोल गिरप (वेंगुर्ला), द्वितीय पवन राणे (दोनापाऊला), बॅडमिंटन सिंगल महिला प्रथम राजेश्वरी वासुकी (हुबळी), द्वितीय डॉ शेरॉन डीमेलो (दोनापाऊला), बॅडमिंटन डबल पुरुष प्रथम अनमोल गिरप व आशुतोष मसुरकर, द्वितीय विनय सामंत व आशिष शिरोडकर (वेंगुर्ला), बॅडमिंटन डबल महिला प्रथम डॉ इलाईन रॉड्रिक्स व डॉ शेरॉन डीमेलो (दोनापाऊला), द्वितीय गौरी तवारगेरी व वानी इरकाल (धारवाड),

      टेबल टेनिस सिंगल पुरुष प्रथम सागर कुलकर्णी (गोवा- मीरामार), द्वितीय दीपक गोपानी (पणजी), टेबल टेनिस सिंगल महिला प्रथम राजेश्वरी वासुकी (हुबळी), द्वितीय शेरॉन डिमेलो (दोनापाऊला), टेबल टेनिस डबल पुरुष प्रथम दीपक गोपानी व प्रशांत कैसरे, द्वितीय दिनेश सिनारी व गौरीश आगनी (सर्व पणजी), टेबल टेनिस डबल महिला प्रथम इलाईन रोड्रिक्स व शेरॉन डिमेलो (दोनापाऊला), द्वितीय गौरी तवारगेरी व वानी इरकाल (धारवाड), कॅरम सिंगल पुरुष प्रथम गौरीश आगनी (पणजी), द्वितीय श्रीकांत भुरके (रत्नागिरी), कॅरम डबल पुरुष प्रथम श्रीकांत भुरके व दर्शन सावंत (रत्नागिरी), द्वितीय शंकर वजराटकर व मुकुल सातार्डेकर (वेंगुर्ला), बुद्धिबळ पुरुष प्रथम उमेश नाईक (परवरी), द्वितीय धीलान शहा (पणजी). 

    या स्पर्धेत रोटरीयन सुरेंद्र चव्हाण, आशिष शिरोडकर, नागेश गावडे यांनी क्रिकेट स्पर्धा, अनमोल गिरप, विनय सामंत, दीपक ठाकूर यांनी बॅडमिंटन स्पर्धा, मृणाल परब, नितीन कुलकर्णी, संजय पुनाळेकर यांनी टेबल टेनिस स्पर्धा, आनंद बोवलेकर, दिलीप शितोळे, पीटर रोड्रिक्स यांनी कॅरम स्पर्धा, आशुतोष मसूरकर, योगेश नाईक, प्रथमेश नाईक यांनी चेस स्पर्धा, सुनील रेडकर, सदाशिव भेंडावडे, राजेश्वर उबाळे यांनी अथल्याटिक्स स्पर्धा आदी स्पर्धांची जबाबदारी पार पाडली. तर मुकुल सातार्डेकर, पंकज शिरसाट यांनी रजिस्ट्रेशन कमिटी, गणेश अंधारी, संजय पुनाळेकर, अनमोल गिरप यांनी हॉस्पिटॅलिटी कमिटी व राजू वजराटकर, दादा साळगावकर, आनंद बांदेकर यांनी फूड कमिटीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.