टोलमुक्तीसाठी जिल्हावासीय एकवटले

सिंधुदुर्ग टोल मुक्त कृतीसमितीच्या उठावाला राजकीय पक्षांचा पाठिंबा
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 22, 2022 16:52 PM
views 569  views

कणकवली :  कणकवली ओसरगाव या ठिकाणी असलेल्या टोलनाक्या विरोधात सिंधुदुर्ग वासिय    एकवटले आहेत.कारण  हा टोलनाका काही दिवसातच सुरू होणार आहे.त्यामुळे  या टोल नाक्याच्या विरोधात आता सिंधुदुर्ग टोल मुक्ती कृतीसमिती तयार करण्यात आली असून या समितीची बैठक आज 11 वाजता कणकवली ओसरगाव टोलनाक्या शेजारी एका हॉटेलमध्ये पार पडली. या  बैठकीत सर्वच राजकीय नेत्यांसह  बहुसंख्या सिंधुदुर्ग वासिय उपस्थित होते. या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यामध्ये जिल्हा वासियांना टोल मुक्ती मिळावी तसेच ओसरगाव मधील राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी मूलभूत सुविधा साठी टोल पार करून जावे लागते त्यांना या टोलचा भुर्दंड  बसत आहे. टोलला पैसे देन्या ऐवजी  आम्ही पर्यायी रस्ता तयार करू अशी  भूमिका  ऍडव्होकेट विलास परब यांनी मांडली .माजी आमदार परशुराम उपरकर यांनी काम अपूर्ण असताना टोल सुरूच करता येत नाही असा देखील मुद्दा उपस्थित केला, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी  सिंधुदुर्गातील गाड्यांना टोल माफी मिळावी त्यासाठी सर्व जनतेने या समितीला पाठिंबा देऊन उठाव करण्याची गरज आहे असे सांगत शिवसेनेचा या समितीला पाठिंबा असल्याचे सांगितले. या टोल मुक्त कृती समितीच्या उठावाला सर्वच संघटना व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. सिंधुदुर्गातील गाड्यांना टोल माफी मिळावी अन्यथा  आंदोलन उभारणार असल्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. त्यामध्ये तुरुंगात जरी जावे लागले तरी चालेल पण जिल्हा वासियांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे असा निर्धार या समितीच्या बैठकीत घेण्यात आला यावेळी टोलमुक्त  समिती अध्यक्ष सतीश लळीत , जिल्हा व्यापारी संघाचे सदस्य,मनसे सरचिटणीस तथा आमदार परशुराम उपरकर ,शिवसेना नेते संदेश पारकर,नंदन वेंगुर्लेकर ,काँग्रेस प्रभारी जिल्हाध्यक्ष इरशाद शेख, बाळू मेस्त्री, वंचित जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, नितीन वाळके ,दीपक बेलवलकर, विलास कोरगावकर ,सुजित जाधव, एडवोकेट विलास परब, संतोष कदम बाळासाहेबांची शिवसेना  गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर, नीलम शिंदे ,अनघा रांगणेकर, यांच्यासह बहुसंख्य लोक उपस्थित होते. या बैठकीत 28 डिसेंबरला कणकवली येथे पुढील बैठक घेनार  असल्याचे देखील ठरवण्यात आले