जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

Edited by:
Published on: July 15, 2024 12:50 PM
views 139  views

रत्नागिरी : ५ कोटी 98 लाख 83 हजार निधी मधून सुसज्ज तयार करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन सभागृहाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन आणि फित कापून सभागृहाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, अधीक्षक अभियंता छाया नाईक आदी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीमधून 3 कोटी 63 लाख 84 हजार व विद्युत खर्चासाठी 2 कोटी 34 लाख 99 हजार असे एकूण 5 कोटी 98 लाख 83 हजार निधी यासाठी देण्यात आला आहे.