
वैभववाडी : तळेरे - गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. याच्या भुसंपादनाबाबत उद्या प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत वैभववाडी तहसील कार्यालयात सकाळी ११ वा. बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तळेरे - गगनबावडा हा राष्ट्रीय महामार्ग नाधवडे, कोकीसरे, एडगाव, करुन या गावातून जातो. या मार्गाचे काम करीत असताना भुसंपादनाचा विषय पुढे आला आहे. त्याकरिता स्वतः प्रांताधिकारी जगदीश कातकर वैभववाडीत येणार आहेत. ज्या जमीन मालकांच्या समस्या असतील त्यांनी सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी केले आहे.