जिल्हास्तरीय 'श्लोक पठण' स्पर्धा

पत्रकार संघ व वृक्षवल्ली डेव्हलपर्सचं आयोजन
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 26, 2023 16:26 PM
views 69  views

सावंतवाडी : तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स मळगाव सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय 'श्लोक पठण' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवारी ३० डिसेंबरला सायंकाळी ३ ते ६ या वेळेत मळगावातील वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या वृक्षवल्ली उद्यानामध्ये होणार आहे. या स्पर्धेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक 1 ते 10 श्लोक, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गीताई १५ वा अध्याय १ ते १५ श्लोक पठण आणि आठवी ते दहावीच्या मुलांसाठी भगवत गीता १२ वा अध्याय १ ते १० श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीनही गटांमध्ये प्रत्येकी पहिला, दुसरा, तिसरा आणि उत्तेजनार्थ असे चार पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकानी आपली नावे तालुका पत्रकार संघाचे सचिव मयूर चराठकर  94058 27169, खजिनदार रामचंद्र कुडाळकर  9763717761, वृक्षवल्ली डेव्हलपर्सचे कविता 94050 76736, दीपक नाईक 9420259680 वर किंवा कार्यालयामध्ये दि.२८ डिसेंबरपर्यंत नोंदवावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.