
सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा यांच्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कॉलेज येथे रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेचा विषय आत्मनिर्भर भारत, विकसित भारत तसेच डिजिटल इंडिया असे आहेत. तर स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे आहेत. चित्रकला स्पर्धेची वेळ रविवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत असणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला ड्रॉईंग पेपर आयोजकांकडून पुरविवण्यात येईल, रंगाचे माध्यम वॉटर कलर, पोस्टर कलर, एक्रेलिक कलर, क्रेयॉन्स कलर, इत्यादी. चित्रासाठी लागणारे सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावयाचे आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी दि. २६ सप्टेंबर पर्यंत करावी. स्पर्धेत अंतिम वेळी बदल करायचा झाल्यास सर्व हक्क मंडळाकडे राहिल. ही स्पर्धा तीन गटात होणार असून यात प्रथम गट - इ.१वी ते इ.५ वी. (रंगभरण स्पर्धा) ,व्दितीय गट - इयत्ता ६वी. ते इयत्ता १०वी तर तृतीय गट-इ.११वी ते वरील खुला गट अशी आहे. तर स्पर्धेसाठी भरघोस अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
यात प्रथम गट इ.१वी ते इ.५ वी (रंगभरण स्पर्धा) प्रथम- २ हजार,द्वितीय- १ हजार,तृतीय - १ हजार, चतुर्थ - रुपये ५०० उत्तेजनार्थ, पंचम - रुपये ५०० उत्तेजनार्थ तसेच द्वितीय गट इ. ६ वी ते इ.१० वी प्रथम- ३ हजार द्वितीय- २ हजार ५००, तृतीय २ हजार, चतुर्थ - १ हजार उत्तेजनार्थ, पंचम १ हजार - उत्तेजनार्थ अशी पारितोषिक, तर तृतीय गट इ.११ वी ते खुला गट प्रथम- ५ हजार रुपये,द्वितीय- ४ हजार रुपये,तृतीय - ३ हजार रुपये, उत्तेजनार्थ प्रथम - १५०० रुपये उत्तेजनार्थ द्वितीय- १५०० रुपये अशी बक्षिसे आहेत. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेत नाव नोंदणीसाठी भारतीय जनता पार्टी कार्यालय दशरथ लक्ष्मण मांजरेकर ७८७५५२५४९६, योगेश गावीत ९४२१३००९०३, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर ७०३८३११७७६, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ ९६७३९४६१८६, बांदा मंडल अध्यक्ष - स्वागत नाटेकर ९४२२३९३४०९, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष - विष्णू (पप्पू) परब ८३९०८३८५८३, दोडामार्ग मंडल अध्यक्ष - दिपक गवस ९०२११८८९६२, जिल्हा कार्यकारणी सदस्य -ॲड परिमल नाईक ९४२२४३६८०५, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रसाद अरविंदेकर ९४२२६३३३३९, जिल्हा कार्यकारणी सदस्य उमेश पेडणेकर ९४२२०७७५३७, शहर मंडल सरचिटणिस ॲड संजू शिरोडकर ९४२२६३३३६६ यांच्याशी संपर्क साधावा तसेच
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजपचे कार्यकारिणी सदस्य ॲड. परिमल नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा बँक संचालक रवि मडगांवकर, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, माजी अध्यक्ष अजय गोंदावळे, ॲड. संजू शिरोडकर, दिलीप भालेकर, बंटी जामदार, उल्हास परब, मिसबा शेख, सविता टोपले आदींसह भाजपचे पदाधिकारी व महिला उपस्थित होते.










