
सिंधुदुर्गनगरी : दीव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहचऊन त्यांचे जीवन फुलविने हे मी माझे कर्तव्य मानतो.हे कर्तव्य मी करण्यात कुठेही कमी पडणार नाही.पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच केंद्रीय मंत्री ना नारायण राणे यांच्या माध्यमातून हे काम आपण करू अशी ग्वाही जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. दीव्यांग बांधवांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात दिली.
लुई ब्रेल दिनाचे औचत्य साधून "जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग" च्या माध्यमातून सिद्धिविनायक हॉल कसाल येथे दिव्यांगांचा जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला. या वेळी श्री सावंत बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लुई ब्रेल व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग चे जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी आपल्या मनोगताने केले. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत व लायन क्लब कुडाळच्या अध्यक्षा सौ. कुलकर्णी, श्यामसुंदर लोट, प्रकाश सावंत, प्रकाश वाघ, भरत परब, अश्विनी पालव, सदाशिव रावुळ, तुळशीदास कासवकर, प्रणाली दळवी, सायली सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला सर्व दिव्यांग बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सावंत साहेब पुढे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी ज्या ज्या योजना आणता येतील व ज्या ज्या योजना राबवता येतील त्या करण्याचा आपण प्रयत्न करू. अशी त्यांनी ग्वाही दिली. तर सौ कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व लायन्स क्लबच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी व दिव्यांग मुलांसाठी करीत असलेले वेगवेगळे कार्य हे सर्वांसमोर मांडले दिव्यांग बांधवांसाठी लायन्स क्लब तर्फे देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांची माहिती दिली. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते प्रशांत कदम यांना पांढरी काठी प्रदान करण्यात आली.
मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त केल्यानंतर उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातून महिला व पुरुषांमधून प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले.
प्रथम क्रमांक पवित्रा तळगावकर, दुसरा क्रमांक अर्पिता दळवी, तिसरा क्रमांक अश्विनी पालव व रेश्मा झोरे या दोघांमध्ये विभागून देण्यात आला. तसेच पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक प्रशांत कदम, दुसरा क्रमांक तुळशीदास कासवकर, तिसरा क्रमांक चैतन्य भगत यांनी पटकावला.या विजेत्यांची निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
महत्त्वाचे म्हणजे उपस्थित दिव्यांग बांधवांचा जीवन विमा उतरवून त्यांना जीवन सुरक्षा कवच देण्यात आले. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग च्या माध्यमातून उपस्थित दिव्यांग बांधवांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात आले.या कामी कसाल आरोग्य उपकेंद्र चे सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे अधिकारी यांनी विशेष भेट देऊन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग च्या कार्याचे कौतुक केले. त्याबद्दल जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग च्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सर्व उपस्थितांचे आभार प्रणाली दळवी यांनी मानले.