
सावंतवाडी : 43 वर्षे सातत्य ठेवणे हे कोणाचं काम नाही. त्यासाठी तसं व्यक्तिमत्व लागतं, तसा माणूस लागतो. तसं व्यक्तिमत्व वसंत जाधव यांच आहे. त्यांच्या या अकॅडमीचा 100 वा वर्धापन दिन असाच साजरा व्हावा. प्रत्येक खेळात चिकाटी लागते. कोण जिंकले कोण हरले याला महत्व नाही. पण, त्या मुलाची जिद्द हे महत्त्वाचं आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हा प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले.
भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब मित्रमंडळ, सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो-कराटे - आकिदो असोसिएशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय भव्य ज्युदो स्पर्धा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी संजू परब बोलत होते.यावेळी संजू परब यांच्या हस्ते या स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, अजय सावंत, सत्यवान बांदेकर,वसंत जाधव, दत्तात्रय मारकड, बबन केवटे, दिनेश जाधव आदी उपस्थित होते.