
वेंगुर्ला : ईसोटी प्रासादिक मित्र मंडळ, मातोंड, भरभरेवाडी तर्फे जिल्हास्तरीय भव्य निमंत्रित भजन स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळा व सत्कार समारंभ कार्यक्रम सायंकाळी ६ वा होणार असून निमंत्रित भजन मंडळांचे सादरीकरण सायंकाळी ७ वाजल्यापासुन सुरू होणार आहे.
श्री देवी भवानी प्रा. भजन मंडळ न्हावेली (रेवटेवाडी) बुवा अक्षय जाधव, महापुरुष प्रा. भजन मंडळ पिंगुळी बुवा प्रसाद आंबडोस्कर, श्री देव रवळनाथ प्रा भजन मंडळ पाडलोस बुवा अजित गावडे, बाळगोपाळ प्रा. महिला भजन मंडळ, हरकुळ खुर्द बुवा आकांक्षा राणे, श्री देव रवळनाथ प्रा. भजन मंडळ पिंगुळी बुवा रूपेश येमकर, श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रा. भजन मंडळ, जानवली, कणकवली बुव योगेश मेस्त्री, सद्गुरू प्रा. भजन मंडळ, अणसूर बुवा हर्षल मेस्त्री, श्री दत्त प्रा. भजन मंडळ (वर्दे) बुवा नरेंद्र मेस्त्री, श्री देवी माऊली भजन मंडळ - साटेली बुवा सत्यनारायण कळंगुटकर आदी निमंत्रितांची भजन सादर होणार आहेत. पारितोषिक वितरण सोहळा व तज्ञ परीक्षकांचे सादरीकरण रात्री १२.३० वा. होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदक कवी नमाई सुभाष गंगाराम नाईक करणार आहेत. सांघिक व वैयक्तिक पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना दिली जाणार आहेत. गुरूवार दिनांक १६ मे २०२४ रोजी मातोंड, भरभरेवाडी येथे उपस्थित रहाण्याचे आवाहन ईसोटी प्रासादिक मित्र मंडळ, मातोंड, भरभरेवाडी यांच्याकडून करण्यात आले आहे.