
सावंतवाडी : कोलगाव येथील ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानतर्फे शनिवार १७ व रविवार १८ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये, द्वितीय १२ हजार रुपये, तृतीय १० हजार रुपये व अन्य उत्तेजनार्थ पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली आहेत. कोलगाव सातेरी मंदिरात सदर स्पर्धा संपन्न होईल.
शनिवार १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल. या दिवशी बुवा कुणाल सावंत (माजगाव), बुवा गौरांग राऊळ (मळगाव), बुवा रुपेश यमकर (पिंगुळी), बुवा पुरुषोत्तम परब (वेंगुर्ले) आणि बुवा विराज तांबे (वैभववाडी) यांची भजने सादर होतील. रविवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता स्पर्धेच्या भजनांना सुरुवात होईल. या दिवशी बुवा अजित गावडे (पाडलोस), बुवा प्रसाद आमडोसकर (कुडाळ), बुवा सोमेश वेंगुर्लेकर (वजराट वेंगुर्ले), बुवा अमित तांबुळकर (तांबुळी), बुवा अखिलेश फाळके (देवगड) व बुवा विश्राम घाडी (मालवण) यांची भजने सादर होतील. त्यानंतर बुवा अनिल पांचाळ यांची खास संगीत सभा होईल. स्पर्धेसाठी वैभव खानोलकर व राजा सामंत हे निवेदन करतील. भजनप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोलगाव ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.