
मंडणगड : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी आणि हिंदी अध्यापक संघ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा जिल्हास्तरीय 'कृतिशील हिंदी अध्यापक ' पुरस्कार मंडणगड येथील हिंदी विषयाचे कृतिशील शिक्षक नरेश माटवणकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार देण्यासाठी तालुक्यातून एका शिक्षकाची निवड करून दिला जातो शैक्षणीक वर्ष 2025/26 या शैक्षणिक वर्षासाठीचा हा पुरस्कार श्री माटवणकर यांना दिला गेला आहे.
यापुर्वी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले श्री माटवणकर सध्या संस्थेच्या लाटवण येथील हायस्कूलमध्ये कार्यरत झाले आहेत. त्यांना मीळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.










