पंढरीनाथ तेंडोलकर यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

अ. म. प्राथ. शिक्षक संघ कुडाळच्यावतीने अभिनंदन
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 10, 2023 12:17 PM
views 187  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन 2022 23 चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पंढरीनाथ अनंत तेंडोलकर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा अनाव दाभाची वाडी, कुडाळ यांना प्राप्त झाल्याबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग तालुका शाखा कुडाळचे पदाधिकारी, महिला सेल शाखा कुडाळ सर्व पदाधिकारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. 

पंढरीनाथ तेंडोलकर हे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, डॉ ए पी जे अब्दुल कलाम परीक्षा, एमटीएस, बीडीएस, अशा विविध स्पर्धा परीक्षेत दैदीप्यमान यश मिळविले आहे. क्रीडा स्पर्धेत अनेक वेळा जिल्हास्तरावर मुलांनी यश प्राप्त केले आहे. ते केवळ तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक आहेत गणितं चे तज्ञ, हस्ताक्षर तज्ञ, उत्तम सूत्रसंचालक, तसेच उत्कृष्ट बुद्धिबळ पटू आहेत. 

त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा कुडाळच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.