जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्या विविध ठिकाणी भेटी

स्ट्रॉंग रूम, मतमोजणी परिसर, आंबोली येथील चेक पोस्टची केली पाहणी
Edited by:
Published on: November 10, 2024 19:52 PM
views 217  views

सिंधुदुर्गनगरी :विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील हे जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन  पाहणी करत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली येथील स्ट्राँग रूमला तसेच सावंतवाडी येथील स्ट्राँग रूम, मतमोजणी परिसराची पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम, सहायक निवडणूक अधिकारी श्रीधर पाटील, ओंकार ओतारी उपस्थित होते. 

पाटील यांनी आंबोली येथील पोलिस दुरक्षेत्र केंद्राची आणि स्थिर सर्वेक्षण पथकाची पाहणी करून आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना दिल्या.