मदर क्वीन्सला जिल्हाधिकाऱ्यांची 'ग्रेट भेट'

Edited by: विनायक गांवस
Published on: July 05, 2025 19:40 PM
views 48  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी या जिल्ह्यातील प्रतिथयश शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवार दिनांक ४ जुलै २०२५ रोजी एक अनोखी 'ग्रेट भेट' अनुभवण्यास मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोसले देखील उपस्थित होते. प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता आल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.