देवगड घटनास्थळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 10, 2023 11:34 AM
views 1101  views

देवगड : देवगड बीच येथील समुद्रात सहली करीता आलेले पुणे येथील ६ विद्यार्थी खोल समुद्रात बुडाले त्यापैकी ४ विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला. १ विद्यार्थी अद्याप बेपत्ता असून एक विद्यार्थी उपचार घेत आहेत. या घटनेची माहिती घेण्यासाठी व प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन रविवारी सकाळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार रमेश पवार, तसेच मंडल अधिकारी ,तलाठी व अन्य उपस्थित होते.