जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ ने सन्मानित

Edited by:
Published on: November 01, 2025 17:03 PM
views 65  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी आयएएस त्रुप्ती धोडमिसे यांना कोकण संस्थेचा प्रतिष्ठेचा ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ नुकताच प्रदान करण्यात आला. हा सन्मान पद्मश्री परशुराम गंगावणे व कोकण एनजीओ इंडियाचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.

या समारंभाला संस्थेचे व्यवस्थापक प्रथमेश सावंत, देवानंद कुबल, गौरी अडेलकर, समीर शिर्के, वैष्णवी म्हाडगूत, शशिकांत कसले, अवंती गवस, रुचा पेडणेकर, अमोल गुरम आणि पद्माकर शेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त करताना त्रुप्ती धोडमिसे म्हणाल्या :

“‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाची आणि भावनिक बाब आहे. माझ्या प्रवासातील संघर्ष, परीक्षांना या पुरस्कार रूपाने समाजाकडून मिळालेली ही दाद, हे माझ्या वैयक्तिक यशापेक्षा संपूर्ण समाजाच्या प्रेरणेचं प्रतिक आहे.”

“मी चौथ्या प्रयत्नात आयएएस झाले; या प्रवासात अनेक अपयश, निराशा आणि आत्मपरीक्षण होतं. पण हार न मानता केलेली सततची मेहनत मला इथपर्यंत घेऊन आली. तरुणांनीही लक्षात ठेवावं अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी. स्वतःवर विश्वास ठेवा, ध्येय ठरवा आणि ते साध्य होईपर्यंत झपाटून काम करा.” असा महत्वाचा संदेश त्यांनी दिला. 

यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी त्रुप्ती धोडमिसे यांचे अभिनंदन करताना सांगितले की, त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास UPSC–MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी त्रुप्ती धोडमिसे यांनी कोकण एनजीओ इंडिया संस्थेच्या सामाजिक कार्याचंही कौतुक करत शुभेच्छा दिल्या.