जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 14, 2023 18:25 PM
views 444  views

कणकवली : मालवण व कणकवली विधानसभा मतदार संघाचे नूतन जिल्हाप्रमुख यांनी आज मुंबईत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. पक्षप्रमुखांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानत या मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करत असताना. तळागाळातील शिवसैनिकांना ताकद देऊन कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच मतदारसंघातील रखडलेल्या व विविध कामाबाबत चर्चा देखील श्री.पारकर यांनी केली.