सायबर सिक्युरिटीबाबत जिल्हा बँक संचालक मंडळ - अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण

प्रशिक्षणासाठी अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर,संचालक मंडळाची उपस्थिती
Edited by:
Published on: December 17, 2023 17:52 PM
views 108  views

सिंधुदुर्ग : वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ दि को - ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे यांच्यामार्फत दि. १२ ते १४ डिसेंबर २०२३ या कालावधीत सुधारित बँकिंग रेग्युलेशन अँक्ट २०२० व सायबर सिक्युरिटी संदर्भात बँकेच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांसाठी  प्रशिक्षण कार्यक्रम जयपुर, राजस्थान येथे आयोजित करण्यात आला होता.

 या प्रशिक्षणासाठी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच अन्य संचालक व वरिष्ठ अधिकारी म्हणून २२ जणांनी सहभाग घेतला.   

नाबार्डचा राजस्थान प्रादेशिक कार्यालयामार्फत सरव्यवस्थापक पांडे तसेच वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉ-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे, मार्फत डॉ.वाय एस पाटील यांनी प्रशिक्षण दिले. तसेच राजस्थान राज्य बँकेसही भेट देऊन त्या राज्यातील जिल्हा बँक व सहकारी संस्थांच्या बँकेची माहिती जाणून घेतली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत केल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती मा.अध्यक्ष महोदय यांनी दिली आपल्या बँकेच्या कामकाजाबाबत राजस्थान राज्य बँकेचे सरव्यवस्थापक श्री.अनिल मेॆथल यांनी समाधान व्यक्त केले.