
कणकवली : मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे गावातील कुपोषित बालकांना (तीव्र व मध्यम तीव्र कुपोषित SAM/MAM) ग्रामपंचायत वागदेमार्फत कायमस्वरूपी व्हिटामिन सिरप सुरु करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ सोमवार, २३ जूनला वागदे ग्रामपंचायत सभागृह येथे सकाळी १०.३० वा. होणार आहे. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वागदे सरपंच संदीप सावंत यांनी केले आहे.