
सावंतवाडी : विशाल सेवा फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित शिवगर्जना या महानाट्याचे व्हीआयपी पास अखेर दाखल झाले आहेत. आज ह्या व्हीआयपी पासचे अधिकृत वितरणाचा शुभारंभ विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या नाटयासाठी अपेक्षित असलेले व्हीआयपी पास अखेर दाखल झाले आहेत. हे व्हीआयपी पास विशाल सेवा फाऊंडेशन यांच्या सावंतवाडीतील मुख्य कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. फक्त ५०० VIP लोकांसाठी उपलब्ध असणार आहेत. तरी ह्या व्हीआयपी पास संदर्भात विशाल सेवा फाउंडेशन च्या सावंतवाडीतील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन विशाल परब यांनी केले आहे.यावेळी वकील रामनाथ बावकर यांना हा पहिला व्हीआयपी पास देवून शुभारंभ करण्यात आला.ह्या महानाट्यास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष विशाल परब यांनी केले आहे.