मंडईतील विक्रेत्यांना छत्री वाटप | राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंचा उपक्रम

Edited by: विनायक गावस
Published on: June 19, 2023 19:39 PM
views 101  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून शहरातील भाजी मंडईतील छोट्या विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आल. माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते या छत्र्यांच वाटत करण्यात आले. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात प्रत्येकी ५० विक्रेत्यांना या छत्र्यांच वाटप करण्यात आले.

विक्रेत्यांच ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. वर्धापन दिन नुकताच झाला त्या निमित्ताने सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यातीलच हा एक उपक्रम असून काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्यांना महिला, पुरूष अशा छोट्या विक्रेत्यांच उन, पाऊस या पासून संरक्षण व्हावे यासाठी वाटप केलं असं मत कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.  

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जावेद खतीब, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नजीर शेख, अल्पसंख्यांक सावंतवाडी तालुकाध्यक्ष  जावेद शेख, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष युक्तिकार राजगुरू, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, महिला निरीक्षक रत्नागिरी जिल्हा दर्शना बाबर देसाई, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी, युवक तालुकाध्यक्ष हर्षद बेग, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, सौ. मारिता फर्नांडिस, जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकूब शेख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर आदी उपस्थित होते.