विजय घरत यांच्यामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 25, 2023 11:44 AM
views 474  views

कणकवली : कित्येक वर्षे कोकणातील शालेय विद्यार्थी १०/१२ वी मध्ये 98/ 100 % मार्क घेऊन संपुर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थानी असतात तेव्हा त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे या हेतुने भाजपा दक्षिण मुंबई उपाध्यक्ष विजय घरत गेली 12 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जोपासून विविध उपक्रम सिंधुदूर्ग जिल्ह्यात राबवित आहेत.


सिंधुदूर्गातील दुर्गम खेड्यातील मुटाट अंगणवाडी ( घाडीवाडी देवगड ) व नडगिवे -खारेपाटण शाळा क्र. १ ( वैभववाडी ) या शाळेस सिधुदुर्गाचे आमदार  नितेश राणे यांच्या हस्ते संगणक ( कॅाम्प्युटर ) देण्यात आले. त्याचप्रमाणे १ ली ते ७ वी तील श्रीराम माध्यमिक विद्या मंदीर ( पडेल देवगड ), येथील ४ शाळेस तसेच वागदे ( कणकवली ) येथील शाळेस , बोर्डवे ( कणकवली )येथील नाथपंथीय गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ संचालित अनाथआश्रमशाळेतील  एकुण एक हजार विद्यार्थ्यांना  जम्बोबुक वह्या व ड्राईंगच्या विशेष वह्या प्रदान करण्यात आल्या तद्प्रसंगी देवगड पडेल सरपंच संदिप पोकळे , कणकवली माजी उपसभापती मिलिंद मिस्त्री , वागदे सरपंच संदिप सावंत , माजी सरपंच , शाळेंचे मुख्याध्यापक  , केंद्र प्रमुख , ग्राम पं . सदस्य ,सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी , बाबु आडिवरेकर , बाबु घाडिगावकर व बंधु , रंजित घाडिगावकर उपस्थित होते.