
कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था, मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल ला रोटरी क्लब कणकवली यांस कडून सॅनिटरी पॅड मशीन भेट देण्यात आली. दिनांक १५ मार्च २०२४ रोजी शाळेमध्ये रोटरी क्लब कणकवली तर्फे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास रोटरी क्लब कणकवलीचे अध्यक्ष रविशंकर परब, माजी सेक्रेटरी रोटरी क्लब कणकवली उमा परब, अंधारी मॅडम, काळसेकर मॅडम, योग गुरु पतंजली संस्थेचे डॉ. लिमये, गायनॅकॉलॉजिस्ट डॉक्टर अश्विनी नवरे उपस्थित होते. डॉक्टर अश्विनी नवरे मॅडम यांनी इयत्ता पाचवी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी बरोबर संवाद साधला. मासिक पाळी आल्यानंतर शारीरिक स्वच्छता, आरोग्यवर्धक आहार, तसेच यादरम्यान होणाऱ्या वेदना, प्रसारमाध्यमांपासून का दूर राहावे, कोणत्या प्रकारचे शारीरिक व्यायाम करावे या संदर्भात मार्गदर्शन केले.
डॉक्टर लिमये यांनी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. योग्य आहार घेणे, व्यायाम करणे, प्रसन्न राहणे, वाचन करणे यामुळे आपले विचार चांगले राहतात असे मार्गदर्शन त्यांनी केले. शालेय उपक्रम आणि अभ्यास याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शालेय सुविधा आवश्यक असतात शालेय वेळेत मासिक पाळी आल्यावर शाळेतील विद्यार्थिनींची अडचण होऊ नये यासाठी सॅनिटरी पॅड मशीन उपयुक्त आहे. रोटरी क्लब कणकवली यांनी शाळेला सॅनिटरी पॅड मशीन देणगी म्हणून दिली. याबद्दल रोटरी क्लब कणकवली चे अध्यक्ष श्री. रविशंकर परब यांचे संस्थेच्या संचालिका सौ. सुलेखा राणे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व रोटरीयन सदस्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कुलकर्णी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी जाधव यांनी केले या कार्यक्रमास शाळेच्या शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते.