
सावंतवाडी : सह्याद्री नाईक मराठा समाजाच्यावतीने जिल्हा संघटना अध्यक्ष अण्णा केसरकर यांच्या हस्ते आरोस येथील केंद्र शाळा श्री गिरोबा विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
शाळेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, कलंबिस्त हायस्कूलचे सेवानिवृत शिक्षक शरद नाईक, आरोस केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख स्मिता नाईक, शाळेचे मुख्याध्यापक फ्रान्सिस लेम उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अण्णा केसरकर यांनी मार्गदर्शन करून आशीर्वाद दिले. सह्याद्री नाईक मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव अस योगदान देत असून,याचाच भाग म्हणून आरोस येथील गिरोबा विद्यालयातील विद्यार्थांना वह्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी केंद्रप्रमुख स्मिता नाईक, मुख्याध्यापक लेम यांनी अण्णा केसरकर यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच केंद्रप्रमुख सौ स्मिता नाईक यांनी शाळेच्या शिक्षकांना झटपट इंग्लिश शिकण्यास उपयुक्त असे हासुरे इंग्लिश प्रायमर पुस्तक भेट दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश मुरकुटे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक फ्रान्सिस लेम यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक उमेश मुरकुटे,फिरोज शहा,रोहिणी चारोस्कर, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.