राजे प्रतिष्ठान तर्फे होडावडे शाळेत साहित्य वाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: August 22, 2024 10:24 AM
views 103  views

सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग तर्फे होडावडे शाळा क्रमांक एक मध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. संस्थापक, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

होडावडे जिल्हा परिषद शाळा न.१ मधील 63 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर तसेच जिल्हा सल्लागार महेंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमचे अध्यक्षा ,होडावडा शाळा क्रमांक 1च्या मुख्याध्यापिका  प्रशांती दळवी, तसेच प्रमुख पाहुणेसंघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर हे उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सचिव रामचंद्र कुडाळकर, उपाध्यक्ष मंगेश माणगावकर,  जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे ,खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, जिल्हा सल्लागार महेद्र चव्हाण,  शिक्षक रविंद्र लोंढे , शिक्षिका अर्चना मक्राणे तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र लोंढे यांनी केले तर आभार राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे सचिव रामचंद्र कुडाळकर यांनी मानले.