BOI च्यावतीने ओटवणे शाळेत साहित्य वाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: November 22, 2025 17:03 PM
views 43  views

सावंतवाडी : बॅक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेच्यावतीने  गावातील चारही प्राथमिक शाळेतील सर्व १६६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बँक ऑफ इंडियाच्या स्टार बाँडिंग उपक्रमाअंतर्गत या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. 

यावेळी बँकेचे ओटवणे शाखा व्यवस्थापक लक्ष्मण बोधवड, बँक ऑफ इंडियाचे निवृत्त लिपिक सुरेश पिंगुळकर, ओटवणे शाखेचे सहाय्यक व्यवस्थापक शुभम जाधव, पत्रकार दीपक गावकर, शाळा नं. १ चे मुख्याध्यापक सागर मेस्त्री, शिक्षिका संगीता सावंत, रेणुका कानसे, रूपाली मर्गज, पांडुरंग सरमळकर, शाळा नं. २ चे मुख्याध्यापक विलास राऊळ, शिक्षिका दिपाली घुले, प्रतिभा तुळसकर, नुतन रांगणेकर, शाळा नं ३ च्या मुख्याध्यापिका वैभवी सावंत, शिक्षिका सुरेखा चव्हाण, शाळा नं ४ च्या कांचन अणसुरकर उपस्थित होत्या. 

यावेळी शाखाप्रबंधक लक्ष्मण बोधवड यांनी बँक ऑफ इंडियाच्या गृह कर्ज, वाहन कर्ज, शेती कर्ज, मुद्रा कर्ज विना जमीनदार आणि विना तारण कमी व्याज दरात उपलब्ध असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करून थकीत कर्जातून मुक्त होण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या स्टार संजीवनी योजने अंतर्गत एकरकमी रक्कम भरून कर्ज मुक्त व्हा असे आवाहन केले. यावेळी शाखा सहाय्यक व्यवस्थापक शुभम जाधव, सुरेश पिंगुळकर यांनी बँकांच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ मिळण्यासाठी आतापासूनच बँकेचे खाते सुरू करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण केल्याबद्दल या चारही शाळांच्या मुख्याध्यापकांनी बँक ऑफ इंडियाचे आभार मानले.