
वैभववाडी : मुंबई येथील हॅन्डिकॅप अर्न ॲन्ड लर्न हेल्थ ट्रस्ट यांच्यावतीने अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या ट्रस्टचे अवधूत रावराणे यांच्या माध्यमातून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
शिक्षणाच्या प्रवाहापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता हॅन्डिकॅप अर्न ॲन्ड लर्न हेल्थ ही ट्रस्ट गेली अनेक वर्षे शैक्षणिक साहित्य वाटपाचे उपक्रम राबवित असते.दरवर्षी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.याही वर्षी या संस्थेच्या माध्यमातून अर्जुन रावराणे विद्यालयातील ६०विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी अवधूत रावराणे म्हणाले, पुढील शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील प्रयत्न करावेत. त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देता येईल असे आश्वासन दिले.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, हॅन्डिकॅप अर्न ॲन्ड लर्न हेल्थ ट्रस्ट मुंबई चे ट्रस्टी अवधूत रावराणे, मिनाक्षी आमटे, अनिता पाटील व इतर ट्रस्ट चे सहकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.