
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त 'साहस प्रतिष्ठान' दिव्यांग केंद्र सावंतवाडी येथे अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. दिव्यांग मुलांसोबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी साजरा केला.
यावेळी माजी नगरसेविका अनारोजिन लोबो, भारती मोरे, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, गीता सुकी, शिवानी पाटकर, निलिमा चलवाडी, सायली होडावडेकर, लतिका सिंग, भारती परब, पुजा नाईक, साधना मोरे,सिमा सोनटक्के, ज्योत्स्ना सुतार, आरती खोरागडे, धनश्री सावंत, रुपा मुद्राळे, सत्त्वशीला कुपवडेकर, कांचन जाधव, रेश्मा नदाफ, मनाली राऊत आदि महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










