नाग्या महादू वस्तीगृहाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अजय गोंदावळेंचा पुढाकार ; CM फडणवीसांच्या वाढदिवसाचं निमित्त
Edited by: विनायक गांवस
Published on: July 22, 2025 17:10 PM
views 88  views

सावंतवाडी : वेताळबांबर्डे कदमवाडी येथील शोषित मुक्ती अभियान संस्था अंतर्गत सावली ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने नाग्या महादू निवासी वस्तीगृहातील मुलांना सावंतवाडी भाजपचे माजी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुलांसोबत केक कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, गुरु मठकर, सुधाकर राणे आदी उपस्थित होते