महेंद्र सांगेलकर यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 17, 2023 14:53 PM
views 233  views

सावंतवाडी : राष्ट्रीय काँग्रेस सावंतवाडीच्यावतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून आली आहे. ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती नाही आणि गणपती सण साजरा करताना फार मोठी कसरत करावी लागते अशा लोकांसाठी तेल,कडधान्याची, गुळ, साखर, अगरबत्ती,कापूर या साहित्याचे  वाटप सावंतधाडी काँग्रेस तर्फे करण्यात आले.

सावंतवाडी तालुक्यातील व शहरातील तब्बल 400 ते 500 लोकांना हे वाटप करण्यात येत आहे. अंदाजे एक हजार रुपये किमतीचे हे धान्य व साहित्याच वाटप करण्यात येत आहे. सध्याच्या महागाईमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला गणेश चतुर्थी सण साजरा करताना फार कष्ट सहन करावे लागत आहेत.

महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेच्या संसाराला थोडाफार हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याने हे वाटप गरजू लोकांसाठी करत असल्याचे काॅग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी शहरध्यक्ष अँड राघवेंद्र नार्वेकर, सावंतवाडी तालुका सरचिटणीस रुपेश आईर, बांदा विभागीय अध्यक्ष भाऊ देसाई , सावंतवाडी काँग्रेस शहर पदाधिकारी समीर भाट आदी उपस्थित होते.