कणकवली विधान सभेतील ७५ माध्यमिक शाळेंना इ लर्निंग किट वाटप

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 06, 2024 15:40 PM
views 87  views

कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार आणि कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार न्यानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत  कणकवली विधान सभा मधील ७५ माध्यमिक शाळेंना इ लर्निंग किट वाटप  कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या हस्ते कणकवली प्रहार भवन कार्यालयात करण्यात आले. यावेळी सर्व शाळेतील शिक्षक व संस्थाचालक उपस्तिथ होते.

या साहित्यामध्ये स्क्रीन ,स्पीकर , माइक ,प्रोजेक्टर , माउस , मेटल स्टैंड , बॅग , पेनड्राइव यामध्ये ५ वी ते १० वी चे सर्व सिलाबर्स मोफत आहेत. त्यामुळे उपस्थित शाळेतील शिक्षकांनी आमदार नितेश राणे व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आभार मानले यावेळी यावेळी दिलीप तळेकर ,संजय नकाशे, कलमठ सरपंच तथा युवा अध्यक्ष संदीप मेस्त्री, संदीप साटम,अमोल तेली,बंड्या मांजरेकर,वामन तर्फे याच्यासह भाजप पदाधिकारी  उपस्थित होते