
देवगड : विजय क्रीडा मंडळ, साई हिल, भांडुप (प.), मुंबई यांच्या सौजन्याने व संतोष मयेकर यांच्यामाध्यमातून, संस्थेच्यावतीने जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वानिवडे नं 2, तालुका देवगड, येथे ग्रामीण भागातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना विजय क्रीडा मंडळ भांडुप मुंबई यांचे सभासद श्री संतोष मयेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आले.
यावेळी वानिवडे गावचे पोलीस पाटील गुरुनाथ वाडेकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य नीलेश राघव अर्पिता राघव, मासये, श्रीमती प्रभू, शाळेचे मुख्याध्यापक वेखंडे, त्यांचे सहकारी पवार, शिवणकर व महाराष्ट्र ग्रामीण पञकार संघाचे अध्यक्ष व छायाचित्रकार प्रज्वल गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिवणकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत वेखंडे यांनी केले.
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आली.सरते शेवटी कार्यक्रमाचा समारोप मान्य वरांचे आभार मानत वेखंडे सर यांनी केला.