'कमी तेथे आम्ही'च्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच वाटप

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 07, 2023 14:48 PM
views 179  views

मालवण : समाजासाठी काहीतरी करायचं आहे ह्या निस्वार्थी आणि उदात्त हेतूने होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वायरी येथील " कमी तेथे आंम्ही " या ग्रुपच्यावतीने वायरी, तारकर्ली, देवबाग, देवली या गावातील एकूण बारा शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 


वायरी येथील "कमी तेथे आम्ही" हा ग्रुप अनेक समाजिक उपक्रम राबवत असतो. या ग्रुपच्या वतीने  देवबाग नं 1, देवबाग नं 2, देवबाग नं 3, सेंटपिटर देवबाग, मस्यशाळा तारकर्ली, काळेथर, वायरी बांध, वायरी भुतनाथ, अंबाजी विद्यालय, टिकम शाळा, देवली- 1, देवली - 2 या बारा शाळां मध्ये एकुण 260 विद्यार्थी आहेत.  या विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेटी, पेन्सिल, रबर, इत्यादी साहित्य वाटप करण्यात आलं. गेल्यावर्षी सुद्धा ह्या ग्रुपने हा उपक्रम राबविला होता आणि यापुढे सुध्दा अशीच सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय कामे या ग्रुपच्या वतीने करण्यात येतील असे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.