
देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथील यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ आडबंदर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद मालाडकर यांच्या मार्गदर्शनातून श्री भगवती हायस्कूल आणि विना बांदेकर ज्युनिअर कॉलेज मधील दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी यशस्विनी प्रतिष्ठानच्या सल्लागार रवीना मालाडकर,अंजली सावंत, देवयानी राणे, तुषार आडकर, योगेश लब्दे, शिवराम रासम, अशोक सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवदत्त पुजारे, मुख्याध्यापिका कुंजे, गौरी टवटे मॅडम, प्रसाद बागवे,वीरकर उपस्थित होते.