गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

अर्चना घारे परब यांचा पुढाकार
Edited by: विनायक गावस
Published on: July 18, 2023 20:11 PM
views 136  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर 7 झिरंगवाडी येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अर्चना घारे-परब यांनी याप्रसंगी मुलांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केल. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अँड. सायली दुभाषी, सावली पाटकर, हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी आदी उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य मुलांना दिल्याबद्दल शाळेच्या शिक्षकांनी पदाधिकार्यांचे आभार मानले.