वारगाव प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 16, 2023 14:29 PM
views 289  views

कणकवली : कणकवली वारगाव प्राथमिक शाळेतील 80 विद्यार्थ्यांना डॉ. विलास डहाणू यांच्या वाढदिवसानिमित्त व नडगीवे इंग्लिश मीडिया स्कुल चेअरमन मनोज गुळेकर यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व छत्री चे वाटप करण्यात आले. यावेळी माझी जिल्हा परिषद सद्स्य बाळा जठार, सरपंच नम्रता शेट्ये, उपसरपंच नाना शेट्ये , बाळा शेट्ये, माझी उपसरपंच इरफान मुल्ला, तंटा मुक्ती अध्यक्ष राजेश जाधव, मोहन कावळे, ऍड. सागर तळेकर, उद्योजक तेजस जमदाडे यांच्या सह वारगाव ग्रामस्थ व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

यावेळी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन मनोज गुळेकर यांनी मुलांशी संवाद साधत मुलांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. मुलांना चांगलं माणूस बनण्यासाठी आपण काय करायला हवं हे छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून सांगितले व आज मला तुमच्याशी संवाद साधून खूप बरं वाटलं मी देखील एक इंग्लिश मीडियम स्कूल चालवतो तेथे माझी सर्व मुलं ही खेळतात अभ्यास करतात तशाच पद्धतीने आपण सर्व मुलांनी भविष्यात अभ्यास करून आपले भविष्य उज्वल करावे कधीही काही गरज लागली तर मला सांगावे असे गुळेकर यांनी सांगितले.