चराठे पीएमश्री शाळेला शैक्षणिक साहित्याच वाटप

सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने सावंतवाडी शाखेचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: September 16, 2025 16:18 PM
views 143  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्या सावंतवाडी शाखेच्यावतीने चराठे पीएमश्री शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.         

यावेळी चराठा सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच राजन परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश परब, शिक्षणतज्ञ दिगंबर पावसकर, ख्रिश्चन असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष अँथोनी डिसोजा, सचिव इलियास गोम्स, सदस्या सौ सिल्व्हिया फर्नांडिस, कु. रेचल डिसोजा, चराठे गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते क्लेटस फर्नांडिस, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर, शिक्षिका आदिती चव्हाण, अमिषा कुंभार, धनदा शिंदे, अंगणवाडी सेविका निखिता राणे, श्रीम. मेस्त्री, मदतनीस श्रीम. गोसावी, श्रीम. परब आदी उपस्थित होते. 

यावेळी विद्यार्थ्यांना लाडू व चॉकलेट्स यांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्या सावंतवाडी शाखेच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर यांनी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण केल्याबद्दल सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्या सावंतवाडी शाखेचे आभार मानले.