
वेंगुर्ले : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला मनसे तर्फे आसोली हायस्कुल आसोली येथे प्रशालेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी भाषेसाठी नेहमीच आग्रही राहिली आहे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत हीच नेहमीची भूमिका मनसे ची राहिली आहे, सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घालण्याचा पालकांचा जो ओढा वाढला आहे हा फार चिंतेचा विषय आहे असे यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सनी बागकर यांनी सांगितले. भविष्यातही आम्ही मनसे च्या मार्फत शक्य होईल तेवढी मदत शाळेसाठी करू अशी ग्वाही उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका भावना सुशांत धुरी ह्यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले. यावेळी उपतालुकाध्यक्ष महादेव तांडेल, विभाग अध्यक्ष पवन बागायतकर, शहर अध्यक्ष सुरज मालवणकर, विभाग अध्यक्ष संतोष परब. शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.