तुषार धुरी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 22, 2023 18:19 PM
views 86  views

देवगड : देवगड पोयरे येथे युवासेना उपतालुकाप्रमुख तुषार कृष्णा धुरी यांनी सरस्वती पूजनाचे औचित्य साधून जि.प प्राथमिक शाळा पोयरे गादववाडी येथील शाळेस कवायत बँड सह शैक्षणिक साहित्य वाटप केले. येथील शाळेस कवायत बँड साहित्याची आवश्यकता असल्याचे युवासेना उपतालुकाप्रमुख तुषार धुरी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी स्वखर्चाने सरस्वती पूजनाचे औचित्य साधून या शाळेस कवायत साहित्य दिले आहे,तसेच विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील केले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न राहतील असे प्रतिपादन उपतालुकाप्रमुख तुषार धुरी यांनी यावेळी केले.

यावेळी मंचकावर माजी नगरसेविका प्रगती रुपये,ग्रामपंचायत सदस्य प्रसाद घाडी , सरपंच गीता राणे , पोलिस पाटील संतोष पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष रविंद्र रुपये , शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुरेंद्र रूपये , शाळा मुख्याध्यापक महादेव बागडे , युवासेना शाखाप्रमुख प्रमोद घाडी, सुधाकर घाडी , कमलेश घाडी , कृष्णा धुरी,शांताराम धुरी , सरस्वती धुरी, प्रकाश माळकर, अमोल रूपये, पंढरी माळकर, सुनील धुरी, सुनील रूपये, उमेश माळकर , पांडुरंग रुपये,गुरू माळकर, सुरेश धुरी, अनिल रुपये, सितकांत रूपये,गणेश धुरी,प्रमोद रूपये, तुकाराम लाड,सौरभ धुरी, संतोष धुरी, प्रमोद धुरी, उपसरपंच समीर तावडे, गोपाळ रुपये ,विजय माळकर ,सुवाहस मुणगेकर रमेश रूपये , रविंद्र लाड , सुधाकर रूपये,रसिक रूपये , सविता धुरी, कविता धुरी, यामिनी माळकर , सरस्वती माळकर, उमिंला धरी, मनिषा धुरी, अचंना रुपये, मयुरी धुरी ,सुचिता माळकर , शालिनी माळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते,