
देवगड : शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत प्रगत विद्या मंदिर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. विजय क्रीडा मंडळ, साई हिल, भांडुप (प.), मुंबई या संस्थेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत प्रगत विद्या मंदिर, रामगड तालुका मालवण येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
एस. एस. सी. परीक्षेत 94 टक्केहून अधिक गुण मिळविलेल्या 4 विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे. चिन्मया शिंदे -96.80%. ,सानिका घाडीगावकर - 96.00℅., निकीता हाटले – 94.60℅, संपदा कदम – 94.60℅. यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी प्रगत विद्या मंदीर या शिक्षण संस्थेचे खजिनदार कुवळेकर,धुरी तसेच या प्रशालेचे मुख्याध्यापक वळंजु, पवार सर, सावंत सर तसेच विजय क्रीडा मंडळ या संस्थेचे अध्यक्ष संतोष कासले आणि संस्थेचे सदस्य गोपाळ सर, संतोष मयेकर, विशाल वेंगुर्लेकर, अनंत राणे हे उपस्थित होते. या उपक्रमाकरीता सहकार्य करणारे सदस्य, हितचिंतक, देणगीदार यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
त्याचप्रमाणे प्राथमिक विद्यालय, बेळणे, कणकवली येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्राथमिक विद्यालय, बेळणे या प्रशालेच्या मख्याध्यापिका व त्यांच्या सहकारी शिक्षिका आणि या गावचे सरपंच गिरकर,उपसरपंच चाळके,तसेच विजय क्रीडा मंडळ या संस्थेचे अध्यक्ष संतोष कासले,संस्थेचे सदस्य गोपाळ सर, संतोष मयेकर, विशाल वेंगुर्लेकर,विजय कासले हे उपस्थित होते.