खर्डेकर महाविद्यालयात शैलेश परब यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

वेंगुर्ला युवासेनेचा उपक्रम
Edited by: दिपेश परब
Published on: August 23, 2023 19:31 PM
views 111  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक दृष्टया राज्यात सर्वात आघाडीवर आहे. पण कांहीं गरीब, हुशार विद्यार्थी पुस्तके व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांअभावी सरावांत कमी पडतात. हे जाणून वेंगुर्ला तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने उद्धव बाळासाहेब ठाकरे वेंगुर्ला तालुका व शहर युवासेनेच्या वतीने व सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून बॅ बाळासाहेब खर्डेकर कॉलेजमधील ११ वी व १२ विज्ञान शाखेच्या गरजू व होतकरू विद्यार्थांना पुस्तक संच व स्पर्धा परीक्षा संच साहित्याचे वाटप करण्यात आले. 

      प्रक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या सुचनानुसार खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्लेतील उच्च निकालाची परंपरा राखणाऱ्या बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातून सायन्समध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे. हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांत उज्वल यश संपादन करण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून पुस्तक संच व स्पर्धा परीश्न संच वितरीत करत आहोत. त्याचा उपयोगः सुयोग्य करून आपले व महाविद्यालयाचे नाव रोशन करा. असे प्रतिपादन यावेळी संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी केले.

    यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, शहर महिला आघाडीच्या मंजुषा आरोलकर, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, प्राचार्य आनंद बांदेकर, प्रा. विणा दिक्षीत, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत, वासुदेव परब, युवासेना उपशहर प्रमुख  वैभव फटजी, रफिक शेख, श्रीधर पंडीत, प्रा. जे. वाय. नाईक यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

  यावेळी बँ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील ११ व १२ वी सायन्सच्या २० विद्यार्थ्यांना पुस्तक संच व स्पर्धा परीक्षा संच यांचे वितरण करण्यात आले. तर दोन गरीब विद्यार्थीना मोफत गणवेश वाटप युवासेनेचे पदाधिकारी पंकज शिरसाट यांचे हस्ते झाले.  पुढील वर्षी या महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण २०० विद्यार्थ्यांना पुस्तक संच देणार आहोत. त्यासाठी महाविद्यालयाने गरजू विद्यार्थ्यांची यादी द्यावी असे सूचित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विणा दिक्षीत यांनी केले.