ग्रामपंचायत कारिवडेच्यावतीने डस्टबिनचं वाटप...!

Edited by:
Published on: March 14, 2024 15:00 PM
views 103  views

सावंतवाडी : १५ वा वित्त आयोग ग्रा.प.स्तर बंधित निधीतुन ग्रामपंचायत कारिवडेच्यावतीने कारिवडे गावामध्ये डस्टबिन व सुपलीचे वाटप करण्यात आले.कारिवडे गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सरपंच आरती अशोक माळकर यांनी सांगितले तसेच  डस्टबिनचे  प्रभागनिहाय वितरण करण्यात आले त्यामुळे नागरिकांसाठी सोयीचे झाले.

यावेळी कारिवडे गावचे सरपंच सौ.आरती अशोक माळकर,श्री.नितिन मधुकर गावडे उपसरपंच, श्री.महेश गावंकर ग्रामपंचायत सदस्य,सौ.साक्षी सचिन परब ग्रामपंचायत सदस्य,सौ.तन्वी तानाजी‌  साईल  ग्रामपंचायत सदस्य, सौ.अरुणा संजय सावंत ग्रामपंचायत सदस्य,सौ.भाग्यश्री भालचंद्र भारमल ग्रामपंचायत सदस्य श्री.अशोक माळकर,श्री.तानाजी साईल,श्री.भरत‌दिगंबर बुंदे, यांच्याहस्ते वितरण करण्यात आले यावेळी प्रत्येक प्रभागात मोठ्या संख्येने महिला ग्रामस्थ उपस़्थित होते.