संदीप गावडेंच्या पुढाकारातून मोफत वह्यांचे वाटप...!

Edited by: विनायक गावस
Published on: July 28, 2023 15:28 PM
views 101  views

सावंतवाडी : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या पुढाकारातून आंबोली जिल्हा परिषद मधील ३५ शाळांमधील १२७५ विद्यार्थ्यांना तब्बल ८५३३ मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. सेवा समर्पण सातत्याच हे सलग ६ वर्ष आहे.

चौकुळसह आंबोलीतील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. सेवाभावातून गेली सहा वर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कोणतीही कमी पडू नये यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे मत माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी व्यक्त केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, सुरेश शेटवे -चौकूळ  सरपंच, गुलाबराव गावडे - माजी सरपंच, ग्रा. प. सदस्य, विजय गवस - गेळे उपसरपंच उल्हास गावडे.- आंबोली तंटामुक्ती अध्यक्ष, बबन गावडे,दीपक गावडे,दयानंद गावडे, संतोष परब, अनिल परब, विनोद गावडे,संदिप गावडे, किशोर गावडे,गजानन गावडे, मनीष परब, तानाजी गावडे आदी उपस्थित होते.